महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रिक्षाचालकाची निर्घृण हत्या - पुणे पोलीस

पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात एका रिक्षाचालकाचा मंगळवारी मध्यरात्री कोयत्याने वार करून खून करण्यात आला. राहुल विनायक जगताप असे खून झालेल्याचे नाव आहे.

koregaon park murder
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रिक्षाचालकाची निघृण हत्या

By

Published : Jul 1, 2020, 12:49 PM IST

पुणे -कोरेगाव पार्क परिसरात एका रिक्षाचालकाचा मंगळवारी मध्यरात्री कोयत्याने वार करून निघृण खून करण्यात आला. राहुल विनायक जगताप असे खून झालेल्याचे नाव आहे. खून झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राहुल जगताप हे कवडे वस्ती येथे वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील लेन नंबर 5 मधून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची रिक्षा अडवून हल्ला केला. त्यांच्यावर कोयत्याने वार करून हल्लेखोर पसार झाले. जवळच्याच नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर कोरेगाव पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत राहुल जगताप यांच्या नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु डॉक्टरांनी दवाखान्यात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून, मृत राहुल जगताप याचे कुणासोबत वैर होते का किंवा यामागे आणखी कुठले कारण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details