पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ऑनलाईन माध्यमांच्या सुविधांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
ट्रस्टकडून 'ऑगमेंटेड रिअॅलिटी'द्वारे दर्शन
यंदा दगडूशेठ ट्रस्टने 'ऑगमेंटेड रिअॅलिटी' या तंत्रज्ञानाद्वारे देखील गणेशभक्तांना घरबसल्या आरतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अशा सर्वच ऑनलाईन सुविधांचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. शुभेच्छा संदेशाचे पत्र मोदींनी दगडूशेठ ट्रस्टला पाठवले आहे. गणेशभक्तांना घर बसल्या व्हर्च्युअल माध्यमांद्वारे गणेशाचे दर्शन व आरतीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल मोदी यांनी ट्रस्टचे कौतुक केले आहे.
मोदींनी काय लिहिलंय पत्रात?
संदेश
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे द्वारा मनाए जा रहे 129वें गणेशोत्सव के बारे में जानकर प्रसन्नता हुई। कोरोना महामारी को देखते हुए श्रद्धालुओं के लिए वर्चुअल माध्यम से श्री गणेश दर्शन और आरती का आयोजन प्रशंसनीय है।
लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने आस्था को समाज और संस्कृति के साथ जोड़ कर देश की आजादी के संघर्ष के लिए लोगों में एकजुटता की भावना को प्रगाढ़ किया। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट, पुणे द्वारा आयोजित गणेशोत्सव उसी समृद्ध परंपरा को मजबूती देता है। आजादी के अमृत पर्व के संयोग के साथ इस वर्ष गणेशोत्सव का आयोजन और भी विशेष हो गया है।
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट को आयोजन के लिए हार्दिक शुभकामनाएं। विघ्नहर्ता भगवान श्री गणेश हर किसी के जीवन में सुख, शांति, सौभाग्य और आरोग्य लेकर आए, यही कामना है।
गणपती बाप्पा मोरया !
असे मोदींनी पत्रात लिहिले आहे. दरम्यान, मोदींचा आज 71 वा वाढदिवस आहे. सर्व दिग्गज, नेते, कलाकार, कार्यकर्ते, चाहते मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
हेही वाचा -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर; मुदखेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन