पुणे:पुण्यामध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या आगेमध्ये प्रचंड नुकसान झालेला आहे. त्यानंतर ही आग साधारण असल्याचे समजले होते. पुण्यात सहकारनगर मध्ये, शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोट झाला होता. टीव्हीचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र स्फोटांत झालेल नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय आल्याने एटीएसचा तपास सुरू केला आहे.सोमवारी पहाटे तीन वाजता हा स्फ़ोट झाला होता.
एटीएस कडून चौकशी सुरू: पुण्यातील सहकार नगरमध्ये एका दुकानाला भीषण आग लागली होती. यामध्ये दुकानातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले असून त्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे या दुकान मालकांचे सर्व दुकानच जळून गेल्याची स्थिती निर्माण झाली होती. या भीषण आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याप्रमाणे ही सर्वसामान्य आग आहे असा आपल्याला वाटेल. परंतु या आगीची गंभीरता लक्षात घेता एटीएस कडून याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यात कुठली घातपाताची शक्यता होती का याचा सुद्धा शोध आता घेत आहे.