पुणे -महिला अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी पुणे शहर हादरले आहे. यामध्ये एका अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहे. तर दुसऱ्या एका घटनेत चौदा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे शहरातील अप्पर इंदिरानगर आणि भवानी पेठ परिसरात या घटना घडल्या आहे. याप्रकरणी बिबवेवाडी आणि खडक पोलीस ठाण्यात पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार तर दुसरीवर अत्याचाराचा प्रयत्न - मुलीवर लैंगिक अत्याचार
पीडित मुलगी घराच्या खिडकीत खेळत होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि तुझी खेळणी खाली पडली आहेत, असे सांगून तिला खेळणी घेण्यासाठी खाली बोलावले. पीडित मुलगी खाली आल्यानंतर तिला घेऊन तो जवळच्या गार्डन मध्ये गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दिली. तर दुसरी घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठेत गुरुवारी घडली आहे.
अशा घडल्या घटना
बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेतील पीडित मुलगी अकरा वर्षाची आहे. तर यातील आरोपीचे वय 15 वर्षे आहे. एक मुलगी आणि आरोपी दोघेही अप्पर इंदिरानगर परिसरात एकमेकांच्या घराजवळच राहतात. बुधवारी पीडित मुलगी घराच्या खिडकीत खेळत होती. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला आणि तुझी खेळणी खाली पडली आहेत, असे सांगून तिला खेळणी घेण्यासाठी खाली बोलावले. पीडित मुलगी खाली आल्यानंतर तिला घेऊन तो जवळच्या गार्डन मध्ये गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईला हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात तक्रार दिली. तर दुसरी घटना खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठेत गुरुवारी घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी नमाज पठण केल्यानंतर सार्वजनिक स्वच्छतागृहात जात असताना 47 वर्षीय आरोपीने तिचा रस्ता अडवला. आरोपीने त्यानंतर त्या मुलीचे आणि तिच्या मित्राचे एकत्र असलेले फोटो तिला दाखवले. हे फोटो तिच्या आई-वडिलांना आणि ती राहत असलेल्या वस्तीतील इतर लोकांना दाखवण्याची धमकी देत, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा-नागपुरात १४ ग्रॅम एमसी ड्रग्स सह एकाला अटक; मुख्य तस्कराचा शोध सुरु