महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दगडूशेठ श्रींसमोर अथर्वशीर्ष पठणाची परंपरा कायम, उपक्रमाचे ३४ वे वर्ष - ganesh festival pune 2020 news

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषीपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे यावर्षी हा सोहळा अवघ्या पाच महिलांच्या उपस्थितीत पार पडला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत असून यंदा या उपक्रमाचे हे ३४ वे वर्ष आहे.

उपक्रमाचे ३४ वे वर्ष
उपक्रमाचे ३४ वे वर्ष

By

Published : Aug 23, 2020, 12:43 PM IST

Updated : Aug 23, 2020, 3:41 PM IST

पुणे - 'ओम नमस्ते गणपतये'...चे स्वर ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर यंदादेखील निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला, तर हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत असून यंदा या उपक्रमाचे हे ३४ वे वर्ष आहे.

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी श्री गणरायाचरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरतीदेखील करण्यात आली. उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळदेखील स्वीकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सवकाळात गर्दी करू नये व ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्थादेखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, युट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे दर्शन घेता येणार आहे.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : गणेश मूर्तीं विक्रीत ३० ते ४० टक्क्यांनी घट, फुले विक्रीलाही फटका

Last Updated : Aug 23, 2020, 3:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details