पुणे : मन:शांतीच्या स्थैर्याचा वस्तुपाठ, व्यक्तिमत्व विकासाचा आलेख, स्वयंपूर्णतेचे दिव्य दान, सुख, शांती, समाधान, प्रसन्नता यांसह आत्मानंदाची महायात्रा असलेल्या श्री गणेश अथर्वशिर्ष ( Shri Ganesha Atharvashirsh ) यावरील सर्टीफिकेट कोर्सला प्रारंभ झाला आहे. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ( Savitrabai Phule Pune University ) मान्यतेने श्रीमंत दगडूशेठ हलवाई ( Dagdusheth Halwai ) सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे.
प्राध्यापक हरी नरके यांचा विरोध - कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे. अर्थवशिर्षावरील कोर्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचे केले जात आहे. पण आत्ता याला प्राध्यापक हरी नरके यांनी विरोध केला असून पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्नं ही सनातनी मंडळी रंगवत असून त्यासाठी विद्यापीठे वेठिला धरली जात आहेत. हे धोकादायक पाऊल आहे असे त्यांनी म्हटल आहे.
श्री गणेश अथर्वशिर्ष सर्टीफिकेट कोर्सचा प्रारंभ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी, संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकासाचा आलेख - मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशिर्ष याविषयावरील सर्टीफिकेट कोर्सचा प्रारंभ दगडूशेठ गणपती मंदिरात काही दिवसांपूर्वी झाला. भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले आहे. या कोर्सच्या माध्यमातून भारताची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. हा कोर्स एकच विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्यापीठात असायला हवा.