महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाजार समितीचे पोलीस आयुक्तांना पत्र; जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही नाकारला प्रवेश - पुणे शहर पोलीस

व्यापारी, आडते, हमाल आणि इतर भाजीपाल्यांची आवक करणाऱ्या गाड्यांना पास देण्यात आले होते. मात्र, 31 तारखेपासून पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत.

apmc wrote letter to police commisnor for allowing traders into market yard
बाजार समितीचे पोलीस आयुक्तांना पत्र; जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही नाकारला प्रवेश

By

Published : Apr 1, 2020, 7:55 PM IST

पुणे -शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट परिसरातील गर्दी टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी पास उपलब्ध करून दिलेले होते. ह्या पास व्यापारी, आडते, हमाल आणि इतर भाजीपाल्यांची आवक करणाऱ्या गाड्यांना देण्यात आले. मात्र, 31 तारखेपासून पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत.

बाजार समितीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केलेले पास ग्राह्य धरण्याची विनंती केली आहे.

बाजार आवारात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे बाजार चालवणे अवघड झाले आहे, या तक्रारीसाठी बाजार समितीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केलेले पास ग्राह्य धरण्याची विनंती केली आहे.

बाजार समितीचे पोलीस आयुक्तांना पत्र; जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊनही नाकारला प्रवेश

ABOUT THE AUTHOR

...view details