पिंपरी-चिंचवड (पुणे) - चाकण परिसरात 20 कोटींच्या मेफेड्रॉन ड्रग्स प्रकरणी आणखी तीन जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली असून एकाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. आत्तापर्यंत एकूण 8 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. याची पाळेमुळे ही मुंबईपर्यंत असण्याची शक्यता या अगोदरच पोलीस आयुक्तांनी वर्तवली आहे.
20 कोटींच्या ड्रग्स प्रकरणी आणखी तिघांना अटक; एकाची चौकशी सुरू - पुणे ड्रग्स प्रकरण
दोन दिवसांपूर्वी चाकण परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 20 कोटींचे 20 किलो मेफेड्रॉन ड्रग्स हस्तगत करत पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असताना आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
किरण मच्छीन्द्र काळे, अशोक बाळासाहेब संकपाळ दोघे (रा. शिरूर जि. पुणे), किरण दिनकर राजगुरू (रा. नालासोपारा वेस्ट मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तर, आणखी एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी चाकण परिसरातून अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 20 कोटींचे 20 किलो मेफेड्रॉन ड्रग्स हस्तगत करत पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असताना आणखी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्स प्रकरणी मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलीस आयुक्तांनी वर्तवली असून याचा थेट संबंध मुंबई बॉलिवूडशी आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
यावेळी पोलीस आयुक्त म्हणाले की, ड्रग्स बनवणारे आणि विक्री करणारे यांचा तपास सुरू आहे. मुख्य सूत्रधारापर्यंत आमचा पोहचण्याचा प्रयत्न आहे. सर्व आरोपी हे रसायन कंपनीत काम करणारे आहेत हे स्पष्ट झालेले आहे, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे हा तपास कुठेपर्यंत पोहचणार हे बघावे लागेल.