महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BREAKING : पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळला; राज्यातील संख्या ४२ वर - पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण

आज पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १८ वर पोहचली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४२ वर गेली आहे.

पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण
पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण

By

Published : Mar 18, 2020, 9:10 AM IST

Updated : Mar 18, 2020, 9:29 AM IST

पुणे -जगभरात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज पुण्यात आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १८ वर पोहचली असून महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ४२ वर गेली आहे.

एका २८ वर्षीय महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. 15 मार्चला ती फ्रान्स आणि नेदरलँड या देशांमधून प्रवास करून भारतात आली होती. कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला मंगळवारी (17 मार्च) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर झाले आहे. फ्रान्स आणि नेदरलँड या देशातून आलेला एक प्रवाशी पॉझिटिव्ह सापडला आहे.

दरम्यान, कोरोना बाधित रुग्णांमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४२ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 3 परदेशातील रुग्णांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 18, 2020, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details