महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

summer heat in Katraj zoo : कात्रज प्राणीसंग्रहालयात एअर कूलर, उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्यासाठी खास आहार - वॉटर पूल

कात्रज प्राणीसंग्रहालयात (Katraj zoo) प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी, एअर कूलर (Animals get air coolers) ची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच त्यांच्यासाठी फॉगर्स, वॉटर पूल, (Water pool) काहींना बर्फ केक पुरवण्याची अशी व्यवस्था करण्यात आली आहे

Katraj zoo
कात्रज प्राणीसंग्रहालय

By

Published : May 10, 2022, 5:50 PM IST

पुणे : कात्रज प्राणीसंग्रहालयात उन्हाळ्याच्या उकाड्यावर मात करण्यासाठी प्राण्यांना एअर कूलर सोबतच खास आहाराची काळजी घेण्यात येत आहे. कात्रजच्या राजीव गांधी प्राणी उद्यान आणि वन्यजीव संशोधन केंद्राचे संचालक, डॉ. राजकुमार जाधव, यांनी सांगितले की, प्राण्यांसाठी फॉगर्स, वॉटर पूल, तर काहींना बर्फाचे केक पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सन १९९६ मध्ये कात्रज येथील १३० एकर जागेत नैसर्गिक आभासाचे, प्राणी प्रजोत्पनासाठी, वन्यजीव संवर्धन शिक्षण व संशोधन करण्यासाठी नवीन प्राणीसंग्रहालयाचा विकास करण्यात आला. १४ मार्च २०१४ रोजी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्र असे नामकरण करून नवीन प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. सुरूवातीला हरीण, माकड, अस्वल, वाघ, हत्ती इत्यादी साठी नैसर्गिक आभासाचे खंदक बांधण्यात आले. १९८६ साली स्थापन करण्यात आलेले जुने सर्पउद्यान देखील नवीन प्राणिसंग्रहालयात समाविष्ट करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details