महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'.... यापेक्षा गाणे गाण्याकडे लक्ष द्या'; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना सल्ला - amruta fadnavis on pune lockdown

रुग्णसंख्या आटोक्यात आहे. म्हणून लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करायचे आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचे. अशाप्रकारे डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिणीचे सुरू आहे.

rupali chakankar and amruta fadnavis
रुपाली चाकणकर आणि अमृता फडणवीस

By

Published : Aug 6, 2021, 7:35 AM IST

Updated : Aug 6, 2021, 8:55 AM IST

पुणे -विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीअमृता फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले असताना पुण्यातील निर्बंध का हटवले नाहीत? पुण्यात फक्त चार टक्के रुग्ण संख्या असताना सर्वसामान्य पुणेकरांसाठी पुणे शहर खुलं का झालं नाही? त्यासाठी पुणेकरांनी आग्रह धरला पाहिजे, असे आवाहन अमृता फडणवीस यांनी केले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर

काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?

रुग्णसंख्या आटोक्यात आहे. म्हणून लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करायचे आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायचे. अशाप्रकारे डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिणीचे सुरू आहे. त्यामुळे पुणेकरांनी काय करावं आणि काय करु नये, हे सांगण्यापेक्षा त्यांनी आपल्या गाण्याच्या छंदावर लक्ष द्यावे, अशी बोचरी टीका रूपाली चाकणकर यांनी केली.

हेही वाचा -एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

दरम्यान, या पत्रकार परिषदेत अमृता फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील कौतुकाचा वर्षाव केला. राज्यपालांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून होत असणाऱ्या विरोधाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, राज्यपालांसारखा कर्तुत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील म्हणून त्यांच्या मनात राग असेल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

Last Updated : Aug 6, 2021, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details