महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूरग्रस्तांच्या मदतीवर जाहिरातबाजी करत असाल तर ते दुर्दैवी - खासदार अमोल कोल्हे

सांगली, कोल्हापूरात पुरग्रस्तांसाठी काही धान्य स्वरुपातील तुटपुंजी मदत पुरवत असताना त्यावर मुख्यमंत्री व काही नेत्यांचे हसरे चेहरे असणारे फोटो लावून जाहिरातबाजी केली जात आहे. ही बाब नक्कीच दुर्दैवी आहे, असं मत डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

खासदार अमोल कोल्हे

By

Published : Aug 10, 2019, 6:06 PM IST

पुणे - राज्य सरकारच्या माध्यमातून सांगली, कोल्हापुरात पूरग्रस्तांसाठी काही धान्य स्वरुपातील तुटपुंजी मदत पुरवत आहे. मात्र, त्यावर मुख्यमंत्री आणि काही नेत्यांचे हसरे चेहरे असणारे फोटो लावून जाहिरातबाजी केली जात आहे. ही बाब नक्कीच दुर्दैवी आहे, असं मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारवर निशाणा साधला. ते सांगलीत बोलत होते.

खासदार अमोल कोल्हे
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील अनेक गावांना अमोल कोल्हे यांनी भेट दिली. या भागात शासनाची कुठलीच मदत पोहोचली नसून 3500 लोकवस्ती असणाऱ्या गावात स्थानिक नागरिकांकडूनच मदत कार्य सुरू आहे. मात्र, आजपर्यंत या नागरिकांना मदतीचा हात दिला गेला नाही. त्यांना मदतीची गरज असल्याचे मत कोल्हे यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करत असताना म्हटले आहे.
इसलामपूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना अजुन मदत मिळाली नाही. मात्र, सरकारच्या माध्यमातून तुटपुंजी मदत देत असताना त्यावर जर जाहिरात बाजी केली जात असेल, तर हीदुर्दैवी बाब असल्याचे खासदार कोल्हे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details