पुणे- गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. हे साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संसदेत हा विषय आपण मांडणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
ब्राझीलच्या धर्तीवर इथेनॉल मिक्सींगचे धोरण जाहीर करणे गरजेचे - खासदार कोल्हे - सहकारी साखर कारखाने
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे. हे साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी संसदेत हा विषय आपण मांडणार असल्याची माहिती शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यात ऊसशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. ऊस शेतीवरच शेतकऱ्यांची उपजिविका आहे. सध्याच्या परिस्थितीत साखर कारखान्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर साखर कारखाने देऊ शकत नाहीत, अशी स्थिती आहे. हे साखर कारखाने सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंनी सांगितले. जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ३४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आदी उपस्थित होते.