पुणे- " 'अब कि बार 220 पार' असं म्हणत विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, अशा मोठ-मोठ्या वलगणा केल्या आणि त्यातच राज्यात 105 जागा मिळूनही भाजपला फक्त खुर्चीची व पदाची हाव आहे. यांना राज्यातील शेतकऱ्याचे काहीही पडलेले नाही. अशातच राज्यात सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपची पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तेचा खेळ कसा चाललाय हे राज्यातील प्रत्येक नागरिक पाहत आहे," असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी भाजपला लक्ष्य केले. कोल्हे मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभार मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपला फक्त खुर्चीची अन् पदाची हाव - डॉ. अमोल कोल्हे
राज्यातील दुष्काळी परिस्थिती व परतीचा पाऊस, अशा दुहेरी संकटात शेतकरी होरपळत आहे. तर बहुमत मिळुनही खुर्चीच्या रस्सीखेचीत भाजप व्यस्त आहे. त्यामुळे पुढील काळात तरुणांनी राजकारणाकडे कसं पहायचं, असा प्रश्न पडतो. भाजप राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांनी सत्तेचा खेळ मांडला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती व परतीचा पाऊस, अशा दुहेरी संकटात शेतकरी होरपळत आहे. तर बहुमत मिळूनही खुर्चीच्या रस्सीखेचीत भाजप व्यग्र आहे. त्यामुळे पुढील काळात तरुणांनी राजकारणाकडे कसं पहायचं, असा प्रश्न पडतो. भाजपने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा सत्तेचा खेळ मांडला आहे.
भिमाशंकर चरणी डॉ. अमोल कोल्हेंची प्रार्थना
सत्तेच्या खेळात रमलेल्यांना लवकरात लवकर सुबुद्धी यावी आणि राज्यातील भीषण समस्या सोडविण्यासाठी सरकार स्थापन करावे, अशी प्रार्थना भिमाशंकर चरणी डॉ. अमोल कोल्हेंनी भाषणातून केली. ते आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून यश मिळाल्यानंतर जनतेच्या आभार मेळाव्यात कोल्हे बोलत होते.