महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन लाख पदे रिक्त मग सरकार झोपले का? - अमित ठाकरेंनी सुनावले - Swapnil lonkar suicide

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज केडगाव येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचा धनादेश देत मदत केली आहे.

अमित ठाकरेंनी सांत्वन केलं
अमित ठाकरेंनी सांत्वन केलं

By

Published : Jul 6, 2021, 3:20 PM IST

दौंड (पुणे) -मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज केडगाव येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी अमित ठाकेर म्हणाले, बातम्यांमध्ये वाचले की महाराष्ट्र शासनाची २ लाख पदे रिक्त आहेत. मग हे सरकार झोपले आहे का? की असे काहीतरी घडल्यानंतरच पाऊल उचलण्यासाठी सरकारला येणार, असा सवाल मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच पक्ष म्हणून आम्ही स्वप्नीलच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही म्हणाले.

दोन लाख पदे रिक्त मग सरकार झोपले का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज केडगाव येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी आपली व्यथा अमित राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. स्वप्नीलच्या जाण्याने लोणकर कुटुंबीयांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. इतर स्वप्नील वाचवा, सरकारने एमपीएससीच्या मुलांना न्याय द्यावा, सरकारने फक्त मुलांना आमिष दाखवू नये, फक्त घोषणा करू नयेत तर त्यावर तत्काळ कार्यवाही करावी आणि एमपीएससीच्या मुलांना न्याय द्यावा, अशी भावना स्वप्नीलच्या आई वडिलांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, एमपीएससीच्या मुलांना न्याय मिळाला तर तो स्वप्नील मुळेच मिळेल. तसेच सर्वतोपरी मदत लोणकर कुटुंबीयांना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

स्वप्नीलच्या कुटुंबीयांना मदत

मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नीलच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांचा धनादेश देत मदत केली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची मदत लागली तर केव्हाही संपर्क साधा, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details