महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"लॉकडाऊनमध्ये दारूच्या दुकानांना परवानगी दिल्यामुळे कौटुंबीक संतुलन बिघडण्याची शक्यता"

सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत मद्य विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली असल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी केली. मद्य खरेदीसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या असून, कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे.

surykant pathak
सूर्यकांत पाठक - कार्यकारी संचालक ग्राहक पेठ

By

Published : May 5, 2020, 8:45 PM IST

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मद्य विक्रीची दुकाने सुरू राहणार असल्याने सामाजिक व कौटुंबीक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये दारुच्या दुकानांना मुभा देणे चुकीचे आहे, असे मत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी व्यक्त केले.

सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत मद्य विक्रीची दुकाने उघडी ठेवण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली असल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी रस्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी केली. मद्य खरेदीसाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या असून, कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अशी गर्दी होणे चुकीचे आहे. यापेक्षा वाहन दुरुस्ती आणि इतर आवश्यक सेवांची दुकाने उघडण्यास परवानगी देणे गरजेचे आहे.

पाठक म्हणाले, दारूची दुकाने सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे देखील उल्लंघन सुरु झाले आहे. हे शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यात मद्याची दुकाने सुरु झाल्याचे कळताच अनेक मजूर, गरजू व हातावर पोट असलेले मद्य खरेदीस बाहेर पडल्याचे चित्र होते. खिशात उपलब्ध पैसे दारुवर खर्च केल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असून त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होणार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, स्वयंसेवी संस्था यांनी आजपर्यंत अपार मेहनत केली, जोखीम उचलली. या सगळ्यांचेच खच्चीकरण होईल. त्यामुळे पुण्यातील राजकीय प्रतिनिधींनी यावर त्वरीत आपले मत मांडून योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details