पुणे - राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे प्रथमच बारामतीत आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील कसबा येथून त्यांच्या जंगी संवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत युवकांसाह महिलांचाही मोठा सहभाग असल्याचे पाहायला मिळाले.
बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक - बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे प्रथमच बारामतीत आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत
अजित पवार हे महाराष्ट्रात सर्वांत जास्त मतांनी निवडून आलेले उमेदवार आहेत. सातत्याने त्यांचे बारामती विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राहिले आहे. बारामतीकरांचे अजित पवार यांच्यावर विशेष प्रेम आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आज बारामतीत आले. यावेळी त्यांचे मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.