महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बारामतीतून एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने काढलेल्या रॅलीत युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

By

Published : Oct 4, 2019, 2:50 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने बारामती मधून धनगर समाजामधील नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

विरोधकांनी दिलेला उमेदवार कोण व किती ताकदीचा आहे, याचा विचार न करता प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. आज पर्यंतच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवल्या असून, यंदाही बारामतीतून किमान एक लाखाचे मताधिक्य घेऊन विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचाभाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर.. प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी पराग शहांची गाडी फोडली, सोमय्यांनाही धक्काबुक्की

अर्ज भरण्यापूर्वी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. तसेच पक्षाने काढलेल्या रॅलीत युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. बारामतीतल्या छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरातून भव्य यात्रा काढून अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ABOUT THE AUTHOR

...view details