पुणे - भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. मात्र, बालाकोटचे सत्य लवकरच समोर येईल, असे आश्चर्यकारक विधान अजित पवार यांनी केले. पुणे महानगरपालिकेच्या वारजे माळवाडी येथील कल्चरल सेंटरचे भूमिपूजन रविवारी पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
बालाकोटचे सत्य लवकरच समोर येईल, अजित पवारांचे आश्चर्यकारक विधान - बालाकोट
वंदना चव्हाण पुण्यातुन लोकसभेत जाव्यात अशी माझी इच्छा असल्याचे पवार म्हणाले
ते म्हणाले, की नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे. शरद पवार यांनी नगरच्या जागे संदर्भात कोणताही खुलासा केलेला नाही. तर वंदना चव्हाण पुण्यातुन लोकसभेत जाव्यात अशी माझी इच्छा आणल्याचे पवार म्हणाले. प्रकाश आंबेडकर यांच्या मनात काय आहे कळायला मार्ग नाही. त्यांना आम्ही ४ जागा द्यायला तयार आहोत. तसेच राजू शेट्टी यांनी २ जागा मागितल्या आहेत. आम्ही त्यांना 1 जागा द्यायला तयार आहोत. दरम्यान, मराठा आणि धनगर आरक्षण हे निवडणूकीसाठी केलेली घोषणा आहे, अशी टीका ही त्यांनी यावेळी केली.