पुणे -'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' अस नसतं, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या नाईट लाईफ संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईच्या नाईट लाईफच्या अनुभवानंतरच पुण्यात ती सुरू करायची का नाही हे ठरविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मुंबईची लाईफ स्टाईल वेगळी आहे. मुंबई कधी झोपत नाही, असे म्हणतात. तेव्हा याबाबत पुणेकरांना विश्वासात घेवूनच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडच्या उरो रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात पवार पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार म्हणतात... 'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' अस नसतं हेही वाचा -आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार
आदित्य ठाकरे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड संदर्भात नाईट लाईफचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू. यावर पत्रकारांनी पवारांना विचारले असता ते म्हणाले, की मुंबईचं जीवन वेगळं असून मुंबई 24 तास जागी असते. त्यामुळे मुंबई संदर्भातील नाईट लाईफचा अनुभव काय येतो. त्यातून काही निष्पन्न झाल्यास त्यावर विचार करू. 'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' अस नसतं, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -कसा का होईना पण मी चारवेळा उपमुख्यमंत्री - अजित पवार
पुढे ते म्हणाले, की आपण पुणेकर आहोत, या नाईट लाईफच्या संदर्भामध्ये पुणेकरांच मत वेगळं असू शकत. तिथला अनुभव घेतल्यानंतर पुणेकरांना मान्य होईल, अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करू. यावर बोलताना त्यांनी मी सुरू करणारही म्हटलं नाही आणि नाही देखील म्हटलो नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.