बारामती - बारामतीत कोणीही येऊ द्या त्यांचे आम्ही स्वागतच करू. गेली 55 वर्ष झालं आम्ही बघतोय अनेक जण येतात भेटतात, जातात. बारामतीत पंतप्रधान आले त्यांचेही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, Union Finance Minister Nirmala Sitharaman चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे. बारामतीकरांना भेटावे. मात्र, बारामतीकर त्यांना जे हव आहे तेच करतात अशी, प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
पाच पैशाचाही मिंदा नाही -बारामती तालुक्यातील एका कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काहींना केवळ टेंडर काढण्यातच रस असतो. शेतकरी हिताचे निर्णय घेत नाहीत. असा आरोप केला होता. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, सध्या बारामतीत जी विकास कामे चालू आहेत. ते टेंडर काढण्यात रस आहे म्हणून चालली आहेत काय? बाहेरच्या व्यक्तीने येऊन उचलली जीभ लावली टाळ्याला. हा जरी त्यांचा अधिकार असला तरी, त्याला किती महत्त्व द्यायचं हा बारामतीकरांचा अधिकार आहे. मी ज्या दिवसापासून बारामतीचे प्रतिनिधित्व स्वीकारले आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही कामाच्या टेंडरमध्ये पाच पैशाचाही मिंदा नाही.