महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार येणार बारामतीत; भव्य सत्काराचे आयोजन

अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असणाऱ्या शारदा प्रांगणात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून नागरिकांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्या मागे आकर्षक फलक उभारण्यात आला आहे. तसेच शहरातील चौकाचौका विदयुत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

being-deputy-chief-minister-ajit-pawar-first-time-coming-in-baramati
being-deputy-chief-minister-ajit-pawar-first-time-coming-in-baramati

By

Published : Jan 10, 2020, 11:36 AM IST

पुणे - अजित पवार यांची महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल बारामती तालुका व शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता शारदा प्रांगण येथे हा सत्कार समारंभ पार पडणार आहे. सत्कारापूर्वी दुपारी चार वाजता कसबा येथून अजितदादा पवार यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या कार्यक्रमासाठी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा-नाशिकमध्ये सोन्यापाठोपाठ, पेट्रोलच्या दरातही वाढ

अजित पवार यांचा नागरी सत्कार होत असणाऱ्या शारदा प्रांगणात भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली असून नागरिकांसाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. स्टेजच्या मागे आकर्षक फलक उभारण्यात आला आहे. तसेच शहरातील चौका-चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली असून ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. अजित पवार यांची शहरातील कसबा येथून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मुख्य बाजारपेठेतून शारदा प्रागंणात त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

भव्य सत्काराचे आयोजन
विधानसभा निवडणूक निकालानतंर सत्ता स्थापनेसाठी रगंलेले नाट्य आणि त्यानतंर स्थापन झालेले सरकार तसेच या निवडणुकीत अजित पवार यांना बारामतीकरांनी राज्यात अव्वल क्रमांकाने दिलेली मते. याबाबात अजित पवार सत्कारावेळी नेमके काय बोलणार याबाबत बारामतीकरांना उत्सुकता लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details