महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील टिकेला अजित पवारांचे उत्तर, म्हणाले...

अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात शिवभोजन थाळीचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे यांनी शनिवारी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Ajit Pawar
अजित पवार

By

Published : Jan 26, 2020, 5:39 PM IST

पुणे- नारायण राणेंना उद्धव ठाकरेंमुळेच शिवसेना सोडावी लागली होती. त्यानंतर ते शिवसेनेबद्दल कधीच सकारात्मक बोलले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी निष्ठा असून त्यांच्याबद्दल आदर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नारायण राणेंना ज्या व्यक्तीमुळे शिवसेना सोडावी लागली, तीच व्यक्ती राज्याचा प्रमुख झालेली त्यांना आवडेल का? नाहीच आवडणार हे साधे सरळ गणित आहे. त्यामुळे राणे जे काही बोलले ते त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून बोलले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

हेही वाचा - पुण्यातील ४ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत साकारला तिरंगा, पाहा व्हिडिओ

पवार यांच्या हस्ते आज पुण्यात शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नारायण राणे यांनी शनिवारी पुण्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री असून मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने त्यांनी आयुष्यात एकदाही प्रयत्न केला नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना कुठलाही अनुभव नाही. ते मुख्यमंत्री होतील, असे कधीच वाटले नव्हते. माझ्या महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे जाईल याची चिंता मला आहे, अशी खरमरीत टीका नारायण राणे यांनी केली होती.

हेही वाचा - मी जर शिवभोजन थाळी खाल्ली तर तुम्ही.... अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

यावेळी अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. लोकांच्या मनात महाविकासआघाडी सरकारच्या बाबतीत आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. समाजातील इतरही घटकांसाठी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. त्या दिशेने कामही चालू आहे. राज्यातील जनतेला चांगले काय देता येईल, यावर आम्ही सतत काम करत आहोत. त्यामुळे नारायण राणे विरोधी पक्षात असल्यामुळे ते टीका करणारच असेही पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details