महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरे 'ईडी'च्या चौकशीनंतर गप्प झालेत - अजित पवार

सरकार 'ईडी'च्या माध्यमातून नेत्यांना गप्प करत आहे. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी किती बोलत होते. मात्र, सात आठ तास ईडीची चौकशी झाल्यापासून काय झाले माहीत नाही मात्र, ते गप्प झाले आहेत, हे मी चेष्टेत बोलत नाही तर ही वस्तुस्थिती आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

अजित पवार

By

Published : Sep 11, 2019, 7:12 PM IST

पुणे- हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जायचेच होते. मात्र, ते राष्ट्रवादीवर खोटे आरोप करत आहेत. या सरकारने चौकशी लावून अनेकांना गप्प केले आहे. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही सध्या कमी बोलत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कोहिनूर मिलप्रकरणी राज ठाकरे यांचीही 'ईडी'ने चौकशी केली होती.

'ईडी'वरून अजित पवार यांची सरकारवर टीका

हेही वाचा - काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश; गणेश नाईक, कृपाशंकर सिंह अद्याप वेटींगवर

सरकार 'ईडी'च्या माध्यमातून नेत्यांना गप्प करत आहे. त्यामुळेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी किती बोलत होते. मात्र, सात आठ तास ईडीची चौकशी झाल्यापासून काय झाले माहीत नाही मात्र, ते गप्प झाले आहेत, हे मी चेष्टेत बोलत नाही तर ही वस्तुस्थिती आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - भाजप आमदार संगीता ठोंबरेंसह पती विजयप्रकाश यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश

हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजित पवार यांनी केलेले भाष्य -

राष्ट्रवादी काँग्रेसने फसवणूक केली असे सांगणारे हर्षवर्धन पाटील खोटे बोलत आहेत. त्यांना भाजपमध्ये जायचे होते. ते नाहक आमच्यावर बिल फाडत असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. इंदापूरमध्ये झालेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर मी स्वतः त्यांना पन्नास ते पंचावन्न फोन केले, त्यांनी उचलले नाहीत. पुण्याला त्यांच्या घरी भेटायला गेलो असता ते भेटले नाहीत. त्यामुळे त्यांचे आधीच ठरले होते. आम्ही त्यांची काहीच फसवणूक केली नाही, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - मूळ कार्यकर्त्यांच्या 'आऊटगोईंग'ची धाकधूक; भाजपला अंतर्गत कलहाची भीती

विधानसभेला कॉंग्रेसला जागा सोडू असा कधीच शब्द दिला नव्हता. शरद पवार व राहुल गांधी इंदापूरबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल असेच ठरले होते. पृथ्वीराज चव्हाणदेखील त्यांना थांबा म्हणत होते मात्र, ते थांबले नाहीत. दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात विधानसभा व विधानपरिषद असा तोडगा काढता आला असता. दोघांना आमदार करता आले असते, तरी ते गेले. त्यामुळे त्यांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, असे अजित पवार म्हणाले.

बारामती येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार यांनी इंदापूर तालुक्यातील विधानसभा उमेदवारीच्या वादग्रस्त प्रश्नावरून प्रथमच मौन सोडले. त्यांनी प्रथमच इंदापूरच्या उमेदवारीचा सगळा इतिहासच उलगडला. तसेच हर्षवर्धन पाटील हे गैरसमज पसरवत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले की, मी लोकसभेला स्वतः हर्षवर्धन पाटलांच्या घरी गेलो होतो. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते तेथे उपस्थित होते. तेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी आघाडीधर्म पाळतो असे म्हणाले होते. त्यावेळी मी सर्वांसमोर स्पष्ट सांगितले होते की, राहुल गांधी आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील तो शिरसंवाद्य असेल. मात्र, परवाच्या मेळाव्यात ते साहेब, सुप्रिया व माझ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी शब्द पाळत नाही असे चुकीचे बोलल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details