पुणे - महाराष्ट्रातील यावेळची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे त्यांची शंका दूर करण्यासाठी एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असे पवार म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. जगामध्ये अनेक मोठ्या देशात मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. त्यामुळे आपल्याही राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास हरकत नसल्याचे पवार म्हणाले.
विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही - अजित पवार
महाराष्ट्रातील यावेळची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे शंका दूर करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास हरकत नसल्याचे पवार म्हणाले.
मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी लागल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यामुळे कोणाच्या मनात शंका असतील तर त्या दूर होतील, असेही अजित पवार म्हणाले.
लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात का, असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता, होय मी तेच म्हणतोय, असे अजित पवार म्हणाले.