बारामती (पुणे)-उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या राजकीय कामगिरीमुळे जसे प्रसिद्ध आहे. तसेच ते आपल्या परखड स्वभावाने ही ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज बारामतीकरांनी अनुभवला. फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत काम करणाऱ्यांनी पुढे या मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असे म्हणत, कामाशिवाय फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या.
मिरवणारे बाजुला व्हा, फोटोसाठी पुढे-पुढे करणाऱ्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या - baramati
फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत काम करणाऱ्यांनी पुढे या मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असे म्हणत, कामाशिवाय फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पवारांनी कानपिचक्या दिल्या.
नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीकरांसाठी आठवड्यातील एक दिवस देत असतात. त्यानुसार ते शनिवारी (दि. 14 ऑगस्ट) बारामती दौऱ्यावर आहेत. पहाटेपासूनच त्यांनी बारामतीतील विकास कामांची पाहणी करून शासकीय आढावा बैठकीसाठी ते विद्या प्रतिष्ठान येथे आले असता. शहरातील तांदळवाडी वेस तरुण मंडळाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत व स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठानकडून झाडांसाठी मोफत पाण्याचे टँकर देण्यात आले. याप्रसंगी ज्यांनी काम केले त्यांनीच फोटोसाठी उभे राहा. बाकीचे बाजूला व्हा, असे म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पवारांनी प्रोत्साहन देत नुसते पुढे-पुढे करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
हेही वाचा -Instagram वर ओळख, पुण्याच्या तरुणीने पनवेलच्या तरुणाशी ठेवले शारीरिक संबंध, नंतर केले Blackmail