एअर कमोडोर एस. पी. भंडारे वायुदलाच्या ९ बेस रिपेअर डेपोचे नवे कमांडिंग ऑफिसर - commanding officer
वायुदलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, एअर कमोडोर भंडारे हे १९८८ साली वायुदलाच्या एरोनॉटिकेल इंजिनीरिंग शाखेमध्ये भरती झाले होते. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतले आहे.
पुणे - भारतीय वायू दलाच्या ९ बेस रिपेअर डेपोच्या कमांडिंग ऑफिसरपदी एस. पी. भंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी एस. आनंदान यांच्याकडून पदभार स्वीकाराला आहे.
वायुदलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, एअर कमोडोर भंडारे हे १९८८ साली वायुदलाच्या एरोनॉटिकेल इंजिनीरिंग शाखेमध्ये भरती झाले होते. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून शिक्षण घेतले आहे.
दरम्यान, पुण्यामध्ये वायुदलाच्या तळावर ९ बेस रिपेअर डेपोचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी वायुदलाच्या अधिकाऱ्यांकडून मानवंदना स्वीकारली.