पुणे- माहिती अधिकार कायद्यात (आरटीआय) बदल करून तो निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करत मंगळवारी पुण्यातील बालगंधर्व चौकात माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.
माहिती अधिकार कायद्यातील बदलांच्या निषेधार्थ पुण्यात निदर्शने
या कायद्यात बदल करत मोदी सरकार या कायद्याचा आत्माच काढून घेण्याचा तसेच हा कायदा निष्प्रभ करू पाहात आहेत, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
पुणे
जन आंदोलनाच्या रेट्यामुळे २००५ मध्ये केंद्र सरकारला माहिती अधिकार कायदा करावा लागला होता. मात्र, या कायद्यात बदल करत मोदी सरकार या कायद्याचा आत्माच काढून घेण्याचा तसेच हा कायदा निष्प्रभ करू पाहात आहेत, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. 'आरटीआय बचाव, देश बचाव' अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोबाईल टॉर्च लावत हे आंदोलन करण्यात आले. पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.