बारामती ( पुणे ) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्यावतीने बारामती येथे आंदोलन ( Mahavikas Aghadi protest in Baramati ) करण्यात आले. या निषेध आंदोलनात महाविकास आघाडीच्या शेकडो महिला, पुरुष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारामतीमधील निषेध आंदोलनात ( protest in Baramati ) अनेक पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच या भ्याड हल्ल्यामागे वकील गुणरत्न सदावर्ते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, यांच्यासह भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला. तसेच या पुढील काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बदनाम करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
सदावर्ते यांना बारामतीकराचा इशारा-12 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या समर्थनार्थ बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी गोविंद बाग येथे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर ( Baramati NCP leader warn Gunratn Sadawarte ) यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. आगामी काळात सदावर्ते बारामतीत आले तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.