पुणे- पिंपरी-चिंचवडच्या भोसरी फुलेनगर येथे कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर खचलेल्या पत्नीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज सकाळी 8 च्या सुमारास फुलेनगर येथे घडली आहे. पतीचे दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर आता आईने आत्महत्या केल्याने मुलं मात्र पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर खचलेल्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या - कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची आत्महत्या
कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर खचलेल्या पत्नीने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयसीडी पोलीस करत आहेत.
कोरोनाबाधित पतीचा दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महानगर पालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती खालावल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ते टीव्ही फिटिंगचे काम करून घरातील उदरनिर्वाह भागवायचे. त्यांच्या मृत्यूनंतर घरातील सर्व जबाबदरी पत्नीच्या खांद्यावर आली होती. घरातील 7 वर्षाची मुलगी, 11 वर्षाचा मुलगा यांच्या शिक्षणाचेही सध्या त्यांची पत्नीच पाहात होती.
दरम्यान, पतीच्या मृत्यूनंतर पत्नी एकटी पडली होती. याच नैराश्यातून तिने आज सकाळी आठच्या सुमारास मुलगी घराबाहेर तर मुलगा झोपेत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे हे दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे त्यांनी 'ईटीव्ही प्रतिनिधीशी' बोलताना सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयसीडी पोलीस करत आहेत.