पुणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार संदीप बोत्रे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) आणि प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) हे श्वानाला फिरायला घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बाहेर पडले होते. त्यावेळी दोघांच्या श्वानांमध्ये भांडणे (fight between two dogs) झाली.
Pune: दोन श्वानांची भांडण नंतर मालकांमध्येच पट्ट्याने हाणामारी, चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल - ओंकार संदीप बोत्रे
पुण्यातीलच विद्यापीठ आवारात प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि ओंकार संदीप बोत्रे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) आपल्या श्वानांना फिरायला घेऊन आले होते. त्यावेळेस दोन श्वानांत (fight between two dogs) भांडण सुरु झाले. यावरूनच प्रतीक आणि ओंकार यांच्यात पट्टाने हाणामारी झाली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली (complaint was filed in police station) आहे.
प्रतीक मदने याच्या विरोधात फिर्याद दाखल : त्यावेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मात्र ओंकारने मी श्वानांच्या भांडणात पडणार नाही असे सांगितले आणि तिथून निघून गेला. याचाच राग प्रतीकला आला आणि प्रतिकने मागून जात श्वानाच्या चामड्याच्या पट्ट्याने ओंकारवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ओंकार जखमी झाला. त्यात ओंकारच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर ओंकार बोत्रे याने प्रतीक मदने याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे (complaint was filed in police station). यासंबंधी पोलीस नाईक रायकर अधिक तपास करत आहेत.