पुणे- सध्या देशात व महाराष्ट्रातदेखील कोरोनाची फार मोठी साथ आहे. यामध्ये खरे देवदूत जर कोणी असतील तर ते म्हणजे डॉक्टर, नर्स, कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी- अधिकारी व सफाई कर्मचारी. म्हणूनच रात्रंदिवस या युद्धात झटत असणारे पोलीस कर्मचारी हे दुसऱ्यासाठी मदतीचे कार्य पार पाडत असताना काहींना कोरोनाची बाधा होऊन आपले प्राणही गमवावे लागले आहेत. स्वच्छता आणि सोशल डिस्टन्स असणे महत्त्वाचे आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच आधुनिक पद्धतीच्या सॅनिटायझर स्टॅन्डचे पोलीस चौकीत वाटप करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच आधुनिक पद्धतीच्या सॅनिटायझर स्टॅन्डचे पोलीस चौकीत वाटप - पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट
पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकी याठिकाणी हे सॅनिटायझर स्टॅन्ड देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यामार्फत प्रथमच पिंपरी चिंचवड या शहरामध्ये आधुनिक सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकी याठिकाणी हे सॅनिटायझर स्टॅन्ड देण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा वर्षा जगताप यांच्यामार्फत प्रथमच पिंपरी चिंचवड या शहरामध्ये आधुनिक सॅनिटायझर स्टॅन्डचे वाटप करण्यात आले आहे. तसेच शहरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी हे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर त्यांनी संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकी येथे ते दिले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड मनपाचे माजी महापौर योगेश बहल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, सुधीर चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश केंगार, सतेश जाधव, पालवे, बंडू खाडे पोलीस नाईक, तसेच बाळासाहेब जगताप, सुनील जगताप उपस्थित होते.