एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे राज्यातील 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
एमबीए प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ सुटेना; 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
पुणे - देशातील पदव्युत्तर व्यवस्थापनाची अर्थात एमबीए अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र, राज्यातील महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. कधी तांत्रिक अडचणी, कधी प्रवेश प्रक्रियेची पद्धत बदलणे, तर कधी न्यायालयात याचिका अशा अडथळ्यांत एमबीएची प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. त्यामुळे 35 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.