महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 23, 2019, 10:22 PM IST

Updated : Dec 23, 2019, 11:50 PM IST

ETV Bharat / state

कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून मागील काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

विजय स्तंभ
विजय स्तंभ

पुणे- कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेकिंग, नाकाबंदी यांसारखी खबरदारीही घेतल जात आहे. कोरेगाव भीमा दुर्घटनेच्या अनुशंगाने मागील काळात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे या वेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

बोलताना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक

कोरेगाव भीमा व वढु येथे 202 वा शौर्यदिन 1 जानेवारी 2020 रोजी साजरा होणार आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणची आज विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पाहणी केली.

यावेळी, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी माध्यमांशी बोलताना ग्रामस्थांचे सहाकार्य चांगले असून आम्ही सर्व ठिकाणी बैठका घेत आहोत. त्यामुळे यावर्षीही हा कार्यक्रम शांततेत पार पडेल. तसेच मागील वर्षी ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या देखील सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.

हेही वाचा - मुलासमोर 'तो' पत्नीवर कोयत्याने वार करत राहिला...पिंपरी-चिंचवड मधील धक्कादायक प्रकार

कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनासाठी मानवंदना देण्यासाठी येणारे भाविक वढु येथील गोविंद गायकवाड यांच्या स्थळांवर भेट देण्यासाठी येत असतात त्यामुळे कोरेगाव भिमा सह वढु येथील सुरक्षा लक्षात घेऊन याठिकाणी येणाऱ्या भाविकांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलीसांनी नियोजनाची तयारी केली असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - 'कोरेगाव भीमा विजय स्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा'

Last Updated : Dec 23, 2019, 11:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details