पुणे- बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवसांपासून संततधार पडणार्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. तालुक्यातील कांबळेश्वर येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावरील मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे निवडणूक कर्मचारी व मतदारांना केंद्रात प्रवेश करणे कठिण झाले होते.
बारामती : मतदान केंद्रावर जाण्यासाठी 'ट्रॅक्टर ट्रॉली'चा पूल, दोन दिवसांपासून संततधार - baramati election latest news
बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन दिवसांपासून संततधार पडणार्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले. यावर प्रशासनाने अनोखा उपाय केला. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पूल तयार करून याद्वारे मतदारांना प्रवेश करण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला.
बारामतीत 'ट्रॅक्टर ट्रॉली'च्या साहाय्याने मतदान
यावर प्रशासनाने अनोखा उपाय केला. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने पूल तयार करून याद्वारे मतदारांना प्रवेश करण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला.
या मतदान केंद्रावर एकूण 2096 नोंदणीकृत मतदार आहेत.