पुणे- राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब ही औषधे उपलब्ध होत नसल्याच्या, तसेच औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले असून, दोन्ही औषधांचा साठा मर्यादित असला, तरी तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधींचा साठा पुरेसा, वितरकांची यादी जाहीर - tocilizumab drugs availability pune
ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. तसेच, औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत, त्यांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. तसेच, औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला. औषध वितरणात गैरप्रकारासंबंधी काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाचा टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर माहिती देण्यात यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा-भोर शहरात 27 सप्टेंबरपर्यंत टाळेबंदी