महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CBI Raid In Bribery Case: अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त लाच घेताना रंगेहाथ अटक; सीबीआयने जप्त केले ६ कोटी - अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अटक

पुणे शहरातील महसूल विभागात एका अतिउच्च अधिकाऱ्यावर 'सीबीआय'ने छापे टाकले आहेत. अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त अनिल रामोड असे या अधिकाऱ्याचे नाव असून 8 लाख रुपयांची लाच घेताना 'सीबीआय'ने त्याला अटक केली. सीबीआयने छाप्यात 6 कोटी रुपये जप्त केले आहेत.

CBI Raid In Bribery Case
'सीबीआय'चा छापा

By

Published : Jun 9, 2023, 8:36 PM IST

Updated : Jun 10, 2023, 7:46 AM IST

पुणे:अनिल रामोड हे 'आयएएस' अधिकारी असून महसूल विभागात ते आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर ८ लाख रुपयांची लाच घेताना 'सीबीआय'ने कारवाई केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. रामोड यांना ८ लाख रुपये स्वीकारताना 'सीबीआय'ने पकडले आहे. यासाठी खास सापळा रचला गेला होता.

खासगी निवासस्थानीही छापा:या कारवाईनंतर दुपारी 'सीबीआय'ने रामोड यांचे महसूल विभागातील कार्यालय तसेच सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील 'ऋतुपर्ण' सोसायटी या खासगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. रामोड हे मूळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत. पुण्यासारख्या शहरात एवढी मोठा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच एवढे मोठे अधिकारी थेट लाच घेताना अटक होत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केंद्रीय एजन्सीने त्याच्या मालमत्तेवर छापे टाकताना 6 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली, असे सीबीआयने म्हटले आहे.

आरोपी अनिल गणपत रामोड हा NHAI कायद्यांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी (NHAI) पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी 'लवाद' देखील आहे

दुय्यम निबंधकास लाच घेताना अटक: फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगडच्या सुधागड येथील दुय्यम निबंधक जितेंद्र वाईकर याला 16 एप्रिल, 2021 रोजी अटक करण्यात आली होती. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. तक्रारदार यांच्या मुलाच्या नावे पाली इथं फ्लॅट आहे. या फ्लॅटचे दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करायचे होते. या कामासाठी वाईकर याने त्याचे हस्तक महंमद गुलाम शेख व राजेश राठोड यांच्या माध्यमातून 24 हजारांची लाच मागितली होती. मात्र 20 हजारांवर तडजोड करण्यात आली.

चौघांविरोधात गुन्हा दाखल: या संदर्भात तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली होती. आज 16 एप्रिल रोजी ही रक्कम देण्याचे निश्चित झाले होते, त्यानुसार रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. आज दुपारी आपल्या कार्यालयात ही रक्कम वाईकर याच्या वतीने राजेश राठोड याने स्वीकारली. दरम्यान लाच स्वीकारताना तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वाईकरसह कार्यालयातील खासगी कर्मचारी हरेष ठाकूर, महंमद गुलाम शेख आणि राजेश राठोड यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated : Jun 10, 2023, 7:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details