पुणे - संजीव पुनाळेकर यांचा पुणे येथील विशेष न्यायालयाने 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अॅड संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने अटक केली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण; संजीव पुनाळेकरांना जामीन मंजूर - विशेष न्यायालयाने
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात अॅड संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने अटक केली होती. पुणे येथील विशेष न्यायालयाने अॅड संजीव पुनाळेकर यांचा 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
अॅड. संजीव पुनाळेकर
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली होती. 1 जूनला पुणे सत्र न्यायालयाने पुनाळेकर यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पुनाळेकर यांच्यावर आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला मदत केल्याचा आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. अॅड संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ विविध संघटनांनी तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी देखील सीबीआयचा निषेध नोंदविला होता.