भीमा नदी पात्रातील अवैध वाळू उपशावर कारवाई, ९ फायबर यांत्रिक अन् ८ सेक्शन बोटी नदीपात्रात बुडवल्या - अवैध वाळू उपशावर कारवाई
बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधत कारवाई करत ९ फायबर यांत्रिक बोटी, ८ सेक्शन बोटी नदीपात्रात बुडविण्यात आल्या असून ११ जणांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड (पुणे) -तालुक्यातील शिरापूर गावच्या हद्दीत भिमा नदीच्या पात्रामध्ये अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या सहायाने विनापरवाना वाळू उपासा करणाऱ्या ९ फायबर यांत्रिक बोटी, ८ सेक्शन बोटी नदीपात्रात बुडवल्या आहेत . या वाळू उपसा प्रकरणी ११ लोकांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
आज (दि. १६ नोव्हेंबर) उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना दौंड तालुक्यातील मौजे शिरापूर गावच्या हद्दीत भिमा नदीचे पात्रामध्ये अवैधरित्या यांत्रिक बोटीच्या साहयाने विनापरवाना वाळू उपास करुन उत्खनन करत असल्याची माहिती मिळाली होती . यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील कर्मचारी यांनी मौजे शिरापूर गावच्या हद्दीत भिमा नदीचे पात्रामध्ये कारवाई अवैध वाळू उपशावर कारवाई केली. या कारवाईत एकुण ९ फायबर यांत्रिक बोटी, ८ सेक्शन बोटी, एक जे.सी.बी. मशीन, ३० ब्रास वाळु असा एकूण २ कोटी ३६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल मिळून आला. या कारवाईत ९ फायबर यांत्रिक बोटी, ८ सेक्शन बोटी, ३० ब्रास वाळु नदीपात्रामध्ये मध्यभागी नेत बुडवून नाश केली असून जेसीबी मशिन जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात नाना गवळी,( रा. कानगाव ता. दौंड जि.पुणे) , बंडु सातव (रा. शिरापूर ता. दौड जि.पुणे, ) ,विठ्ठल माळवदकर (रा. बाभुळगाव ता. कर्जत जि. अहदनगर,) , दत्ता गायकवाड (रा. जिंती ता.करमाळा जि.पुण), संदीप काळे (रा. आलेगाव ता. दौंड), हरीभाऊ होलम (रा. शिरापूर ता. दौंड), सलमान मुलाणी (रा. भिगवण ता. इंदापुर जि.पुणे) , संदीप उर्फ सॅन्डी कशमीरे ( रा. घंटाचाळ दौंड), गिरीष मुलचंदाणी (रा. दौंड ता. दौंड जि. पुणे,) बाळु मोरे (रा. शिरापूर ता. दौंड जि.पुणे) , गोविंद मल्हारी भिसे (रा. शिरापूर ता. दौंड जि.पुणे) आणि इतर कामगार यांच्या विरोधात गुन्हा करण्यात आला आहे.