पुणे -महागड्या विदेशी ब्रँडचे बनावट स्कॉच आणि व्हिस्की मद्य तयार करणाऱ्या आरोपीला पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केली आहे. नागा चावडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपचे नाव आहे.
बनावट स्कॅाचसह व्हिस्की तयार करणाऱ्या आरोपीला पुण्यात अटक - आरोपी
पुण्यातील पिंपळे गुरव परिसरातून नागा चावडाला अटक करण्यात आली आहे. नागा चावडाकडून महागड्या ब्रॅण्डच्या जवळपास एक हजार रिकाम्या बाटल्या, पॅकिंगसाठी लागणारे झाकण तसेच वेगवगेळे मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांचे बनावट स्टिकर्स पुणे उत्पादन विभागाने जप्त केले आहेत.

विविध महागड्या ब्रॅण्डची भेसळयुक्त मद्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली आहे. ३५ हजार रुपये किमतीचा भेसळयुक्त मद्य नागा चावडाकडून जप्त करण्यात आले आहे. महाविद्यालीयन विद्यार्थी आणि आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना नागा चावडा भेसळयुक्त मद्य विकत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राज्यात बनावट भेसळयुक्त मद्य विक्री केल्यामुळे कित्येकांचा जीव जात आहे. यामुळे बनावट भेसळयुक्त मद्य तयार करणारे कारखाने शोधून काढणे आणि त्यांचा नायनाट करण्याचे मोठे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे.