पुणे -राज्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी विहिर खोलीकरण आणि बांधणीची कामे सुरू आहेत. अशाच एका विहिरीच्या खोलीचे काम सुरू असताना कठडा ढासळून मातीच्या ढिगाखाली ५ मजूर अडकल्याची धक्कादायक घटना बहुळ येथे घडली आहे. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. निलेश कुऱ्हाडे (वय२०,रा.वडू बुद्रुक,मुळ जळगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे.
विहीर खोलीकरणाच्या कामावर माती ढासळून कामगाराचा मृत्यू - well
खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीतील शेताच्या बाजुला असणाऱ्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. यामुळे विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले. यातील चार जणांना वाचवण्यात यश आले.
खेड तालुक्यातील बहुळ येथील खलाटे वस्तीतील शेताच्या बाजुला असणाऱ्या विहिरीच्या खोलीकरणाचे काम सुरू होते. यावेळी विहिरीत अंडाकृती रिंग टाकून बांधकाम सुरूअसताना अचानक विहिरीच्या काठावरुन मातीची धडी कोसळली. यामुळे विहिरीचे बांधकाम करणारे पाच कामगार मातीसह विहिरीत पडले. यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एका कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाला. त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. नागरिकांची पाण्याच्या शोधात चाललेली धडपड जिवावर येऊ शकते. यामुळे नागरिकांनी धोका लक्षात घेऊन काम करण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले.