पुणे - चासकमान जलाशय परिसरातील बुरसेवाडी डॅम रस्त्यावर बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला. वाहनाने दिलेल्या धडकेत या बछड्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी समोर आले. बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
चासकमान जलाशय परिसरात बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू
रात्रीच्या अंधारात रस्ता ओलांडत असताना वाहनांची धडक बसून अनेक बिबट्यांचे मृत्यू होतात. चाकसमान जलाशयाच्या परिसरात बुधवारी अशीच एक घटना घडली.
बिबट्या
बिबटे शिकारीच्या शोधात रात्रीच्या अंधारात लोकवस्ती व रस्त्यालगत येऊन भटकंती करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बिबट्याचे अपघात व अपघाती मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. वनविभागाकडून बिबट्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना करण्याची मागणी बुरसेवाडी ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंडाळ यांनी केली आहे.