पुणे - मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतिमार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. ओझर्डे गावाच्या हद्दीत ही दूर्घटना घडली. बळवंत कुमार आणि संजय मीर अशी जखमींची नावे आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर भीषण अपघात, एकाची प्रकृती गंभीर - मुंबई पुणे महामार्ग
पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना सकाळी ६ च्या सुमारास पिकअपने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात पिकअपमधील दोन प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणं आव्हानात्मक; सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी प्रयत्न
पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना सकाळी ६ च्या सुमारास पिकअपने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात पिकअपमधील दोन प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तर याच मार्गावरील मुंबई लेनवर देखील आज अपघात झाला. खासगी बसने ढेकु गावाजवळ अज्ञात वाहनाला धडक दिली. यात बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.