पुणे - कोरेगाव पार्क परिसरातील वाटसरुंनी काल चित्तथरारक अपघात अनुभवला. घोडागाडीचे घोडे बिथरुन रस्त्यावर सुसाट वेगाने धावत होते. या गाडीला अडवण्याचा प्रयत्न घोडागाडीचा मालक करत होता. या प्रयत्नात घोडा आणि मालक दोघेही जखमी झाले. या प्रसंगाचे चित्रीकरण घटनास्थळावरुन केले गेले. हा थरार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील कल्याणी नगर भागात एक घोडागाडी जात होती. त्या परिसरातील एका लग्नात मिरवणुकीसाठी ती वापरली जाणार होती. विद्युत रोषणाई केलेल्या या गाडीत कुणीही चालक बसलेला नव्हता. अचानक गाडीचे घोडे बिथरले आणि सुसाट धावू लागले. भररस्त्यात धावणारे घोडे कुण्या गाडीला धडकून अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे गाडीमालक मोटारसायकलवर स्वार होऊन घोड्यांना थांबवण्यासाठी निघाला.