महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज तुकाराम महाराज तर उद्या माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, प्रशासनाची जय्यत तयारी - जहला

भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं"च्या  जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले आहेत.वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आले आहेत.

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी

By

Published : Jun 24, 2019, 3:37 PM IST

Updated : Jun 24, 2019, 4:49 PM IST

पुणे - टाळ-मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करतात. भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात "ज्ञानोबा माऊलीं"च्या जयघोषात वारकरी देवाच्या आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विविध सुखसोयी वारकऱ्यांची सुरक्षा विनाअडथळा प्रवास यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे

आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
आळंदी शहरात वारी मार्गावरही वारकऱ्यांसाठी योग्य ती सुविधा पुरवण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. आळंदी ते पंढरपूर असा पालखी सोहळा होत असताना या सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून अनेक ठिकाणी पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आले आहेत. वारी काळात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Last Updated : Jun 24, 2019, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details