पुणे - महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी सोहळा मंगळवारी पालखीच्या प्रस्थानानंतर वारीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरु होणार आहे. जवळपास २५० किमीचा पायी प्रवास करत टाळ-मृदुंगाच्या नादात विठूनामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरला निघाले आहेत. शेकडो वर्षाची परंपरा असलेली वारी महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. हिच माऊलींची श्रद्धा उराशी धरुन वारकरी भक्तीरसात रमुन टाळ मृग्दांच्या नादात पंढरीच्या दिशेने निघाले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी ते पंढरपूर असे वेळापत्रक
मंगळवार, २५ जून २०१९
श्रीक्षेत्र आळंदीपासून पालखीचे प्रस्थान दुपारी ४ वाजता
गांधीवाडा आळंदी ( पालखीचा पहिला मुक्काम )
बुधवार, २६ जून २०१९
थोरल्या पादुका - ( आरती ), भोसरी फाटा (सकाळचा विसावा ), फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य ),
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा ), पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम )
गुरुवार, २७ जून २०१९
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ, पुणे ( रात्रीचा मुक्काम)
शुक्रवार, २८ जून २०१९
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा ), हडपसर ( दुपारचा नैवेद्य )
१ ) उरूळी देवाची २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा ), सासवड ( रात्रीचा मुक्काम )
शनिवार, २९ जून २०१९
सासवड ( रात्रीचा मुक्काम )
रविवार, ३० जून २०१९
बोरवके मळा ( सकाळचा विसावा ), यमाई – शिवरी ( दुपारचा नैवेद्य ), साकुर्डे ( दुपारचा विसावा ), जेजुरी ( रात्रीचा मुक्काम )
सोमवार, १ जुलै २०१९
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा ), वाल्हे ( दुपारचा नैवेद्य ), वाल्हे ( रात्रीचा मुक्काम )
मंगळवार, २ जुलै २०१९
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा ), नीरा ( दुपारचा नैवेद्य ), श्रीं चे नीरास्नान ( दुपारचा विसावा ), लोणंद ( रात्रीचा मुक्काम )
बुधवार, ३ जुलै २०१९
लोणंद ( दुपारचा नैवेद्य ), चांदोबाचा लिंब उभे रिंगण १ ( दुपारचा विसावा ), तरडगाव ( रात्रीचा मुक्काम )