पुणे- महिलेच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून महाविद्यालयीन तरुणीला अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाठविणाऱ्या साताऱ्यातील तरुणाला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप गणपत जाधव (वय 28) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका महाविद्यालयीन तरुणीने चतुशृंगी पोलिसात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप जाधव याने फेसबुकवर एका महिलेच्या नावाने बनावट खाते उघडले. त्या खात्यातून त्याने तरुणीस फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि फेसबुकच्या मेसेंजरमध्ये त्याने अश्लील फोटो, व्हिडिओ आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. हा प्रकार वारंवार होत असल्याचे पाहुन संबंधित तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली.