महाराष्ट्र

maharashtra

असाही एक विवाह.. वडील कर्तव्यावर; निवृत्त कर्नलच्या मुलीचे पुणे पोलिसांनी केले कन्यादान

By

Published : May 2, 2020, 6:03 PM IST

देहरादून येथील निवृत्त कर्नल देवेंद्र सिंग यांचा मुलगा आदित्य आणि नागपूर येथील निवृत्त कर्नल आणि सध्या नागपूर एम्समध्ये डॉक्टर असलेले कुशवाह यांची मुलगी डॉ. स्नेहा कुशवाह यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला. लग्नाचा मुहूर्त 2 मे होता. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्नाला अडथळे येत होते.

a-unique-wedding-took-place-in-pune-with-the-initiative-of-the-police-dot-dot-dot
a-unique-wedding-took-place-in-pune-with-the-initiative-of-the-police-dot-dot-dot

पुणे- देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना त्याला रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊनही वाढवावा लागतो आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह समारंभ, रखडले आहेत. तर काहींनी मोजक्या लोकांना बोलावून विवाह संपन्न केला आहे. पुण्यात असाच एक विवाह पोलिसांच्या पुढाकाराने पार पडला.

पोलिसांच्या पुढाकाराने पुण्यात पार पडले अनोखे लग्न...

हेही वाचा-विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग

देहरादून येथील निवृत्त कर्नल देवेंद्र सिंग यांचा मुलगा आदित्य आणि नागपूर येथील निवृत्त कर्नल आणि सध्या नागपूर एम्समध्ये डॉक्टर असलेले कुशवाह यांची मुलगी डॉ. स्नेहा कुशवाह यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला. लग्नाचा मुहूर्त 2 मे होता. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्नाला अडथळे येत होते. दोन्हीही परिवार देहरादून आणि नागपूर येथे अडकले आहेत. फक्त वधू आणि वर पुण्यात असल्याने हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारी यांनी पुढाकार घेत या वधू-वराचे लग्न ठरलेल्या मुहूर्तावर लावले. पोलिसांनीच या लग्नसमारंभात कन्यादान केले. तसेच नातेवाईक भूमिकेत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या लग्नसमारंभात उपस्थित होते. मामा आणि इतर नाती जपत तसेच सोशल डिस्टन्सचे नियम तंतोतंत पाळत शनिवारी दुपारी 12 वाजता अगदी साधेपणाने हा विवाह पार पाडला.

ABOUT THE AUTHOR

...view details