महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ येथे उलटला टँकर - पुणे जिल्हा बातमी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा टँकर उलटूल अपघात झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टँकर
टँकर

By

Published : Jan 17, 2021, 5:28 PM IST

Updated : Jan 17, 2021, 10:52 PM IST

दौंड (पुणे) -पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा टँकर उलटूल अपघात झाला आहे. पोलीस घटनास्थळी हजर झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. उलटलेला टँकर सरळ करण्यासाठी पाच क्रेनचा वापर केला जात आहे. ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा टँकर असल्याने खबरादी म्हणून अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी बोलविण्यात आले आहेत.

माहिती अग्निशमन अधिकारी

टँकर उचलण्याचे प्रयत्न सुरू

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभजवळ मुंबईहून ज्वलनशील पदार्थ घेऊन निघालेला टॅंकर चालकाचा ताबा सुटल्याने उलटला. अपघातग्रस्त टँकर सरळ करण्यासाठी पाच क्रेन व अग्निशमन दलाचे तीन बंब बोलविण्यात आले आहेत. खबरदारी म्हणून टँकरवर बंबाद्वारे पाण्याचा फवारा मारण्यात येत आहेत.

घटनास्थळावरुन माहिती देताना पोलीस हवालदार

हेही वाचा -इंदापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी ४१३ कोटींचा निधी मंजूर

Last Updated : Jan 17, 2021, 10:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details