महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : मुजोर रिक्षा चालकाने कहरच केला; प्रवाशाचा तोडला चक्क कान

एका मुजोर रिक्षा चालकाने थेट प्रवाशाच्या कानाचा लचका तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट येथील रिक्षा थांब्यावर हा प्रकार घ़डलाा आहे. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.

Etv Bharat
रिक्षा फाईल फोटो

By

Published : Jun 4, 2023, 3:16 PM IST

पुणे - स्वारगेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाकडून एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता रिक्षा चालकाने त्या प्रवाशाला दाताने चावा घेऊन त्याच्या कानाचा लचका तोडण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रिक्षा चालकावर गुन्हा दाखल - याप्रकरणी रिक्षाचलकाच्या विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रिक्षा चालकाचा शोध घेण्यात येत आहे. संतोष चव्हाण (वय.41, रा. अलिबाग रायगड) असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकाजवळील सातारा रोडच्याजवळील रिक्षा थांब्याजवळ घडली आहे.

भाड्यावरून झाला होता वाद - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संतोष चव्हाण हे त्यांच्या मुळगावी अलिबाग येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानक परिसरात आले होते. ते एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. त्यावेळी एका रिक्षा चालकासोबत त्यांचा भाड्याच्या कारणातून वाद झाला. त्यावेळी तेथील काही रिक्षा चालकांनी त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, वाद झालेल्या रिक्षा चालकाने त्यांच्या कानाच्या वरच्या भागाचा चावा घेऊन लचका तोडला. चव्हाण यांनी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे.

कडक कारवाई करण्याची मागणी - मध्यरात्री पुणे शहरातील पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट या वर्दळीच्या ठिकाणी रिक्षा चालक प्रवाशांकडून जास्त भाडे घेण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. घडलेल्या गा घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा मुजोर रिक्षा चालकांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

पुण्यात गुन्ह्यांमध्ये वाढ - पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. हत्या, मारामारी, लुटमार, गँगवॉर अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी बोलून दाखवली आहे.

हेही वाचा -

  1. Akshay Bhalerao Murder Case: अक्षय भालेराव खून प्रकरणात ॲट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल; सात आरोपींना पोलीस कोठडी; फरार आरोपींचा शोध सुरू
  2. Thane Crime News: वाढीव परताव्याचे आमिष दाखवून चार कोटींचा चूना, बंटी बबलीच्या जोडीसह चार भामट्यांविरोधात गुन्हा
  3. Boyfriend Attacked On Girlfriend: रात्र झाल्याने ती घराकडे निघाली, पण प्रियकराने अडविले; वाद अन् थेट...

ABOUT THE AUTHOR

...view details